दक्षिण सोलापूर कुंभारी हद्दीतील गट नंबर ५५३/१अ २/अ १बी या ठिकाणी आणि कुंभारी हद्दीतील अनेक ठिकाणी मुरूम उपसा करणाऱ्यांवर पंचनामे करून कारवाई करा. ह्युमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सादिक शेख यांनी आज मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सोलापूर, जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन द्वारे तक्रार केली आहे. आणि तसेच याच मागणीचा निवेदन पुणे विभागीय आयुक्त यांना पोस्ट करून पाठवण्यात आला आहे.
या निवेदन मध्ये ह्युमन राईट फेडरेशन ऑफ इंडिया सोलापूरचे जिल्हाध्यक्ष सादिक शेख यांनी १० मे पर्यंत मुरूम उपसा करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी केली आहे .जर १० मे पर्यंत कारवाई झाली नाही तर १० मे पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा सादिक शेख यांनी दिला आहे.
यावेळी ह्युमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सोलापूर शहर जनरल सेक्रेटरी श्रीकांत कोळी, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सोलापूर प्रचार प्रसारक बाळकृष्ण सदाफुले उपस्थित होते
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...