सोलापूर हैदराबाद रोड येथील चंदन काटा येथे दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
याब8 मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी चंदन काटा येथून मुळेगाव रोड कडे दुचाकीवरून जात असताना सोलापूर हैदराबाद कडे जाणाऱ्या रोडवर एका ट्रक क्रमांक MH 10 Z 2639 याचा मागील बाजूचा कट लागल्याने दुचाकी वरील दोन्ही महिला खाली पडून गंभीर जखमी झाले, या अपघातामध्ये ज्योती यशवंत बडगांची वय वर्षे अंदाजे ४७ राहणार तनाबना चौक सोलापूर यांचा मृत्यू झाला असून जयंती कमलाकर उदगिरी वय वर्षे 53 राहणार राजस्व नगर सोलापूर हे गंभीर जखमी झाले आहे.
जखमींना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी मदतनीस उमेश कांबळे यांनी दाखल केले असता उपचारापूर्वीच ज्योती यशवंत बडगांची यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
सदर या घटनेची नोंद सिविल पोलीस चौकी झाली असून अधिक तपास सुरू आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...