सोलापूर – विजापुर नाका पोलीस ठाणे कडील पो.शि. अमृत सुरवसे आणि सिध्देश्वर स्वामी हे दोघे पोलीस स्टेशन हद्दीत रात्रगस्त दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना दि. १० जुलै २०२४ रोजी पहाटे ०४:४५ वाजण्याच्या सुमारास कर्नाटक पासिंग असलेल्या दोन चारचाकी गाड्या एका मागो माग वेगाने सोरेगावच्या रस्त्याने येत असताना दिसुन आले, सदर दोन्ही चारचाकी गाड्यास टिकेकर वाडी रेल्वे ब्रीजचा बोगद्या जवळ आडवुन, दोन्ही गाड्याची पाहणी केली असता, त्यात दरोड्यास लागणारे साहित्य दिसुन आल्याने, दोन्ही पोलीस अमंलदार यांनी घरफोडीच्या अनुशंगाने रात्रगस्त करिता असलेले स.पो.नि. गायकवाड, पो.हे.कॉ. गणेश शिर्के आणि पो.शि. संतोष माने यांना सदर ठिकाणी बोलावुन घेतले.
सदर संशियत ८ इसमाना लगेच ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) कनकमुर्ती ज्ञानदेव गोंधळी रा गांधी नगर, स्टार चौक विजयापुर २) संजय मल्लप्पा पुजारी रा- मु. मु.पो. चिक्करुगी ता- देवर हिप्परगी जिल्हा विजयापुर ३) समीर मक्तुमसाब कोलार रा-मु.पो. चिक्करुगी ता देवरहिप्परगी जिल्हा विजयापुर ४) अभिषेक देवनांद बिरादर रा मु.पो. चिक्करुगी ता- देवरहिप्परगी जिल्हा विजयापुर ५) लिंगय्या हिरय्या हिरेमठ रा-मु. पो. चिक्करुगी ता- देवरहिप्परगी जिल्हा विजयापुर ६) प्रविण मोनाप्पा बडीगेर रा-मु.पो. चिक्करुगी ता देवरहिप्परगी जिल्हा- विजयापुर ७) आकाश बसवराज भासगी रा- मु.पो. सुरगीहळ्ळी ता- सिंदगी जिल्हा विजयापुर ८) रमेश महादेवप्पा सालोडगी सर्व राहणार कर्नाटक, त्या अंतरराज्य टोळीतील टोळी प्रमुख कनकमुर्ती गोंधळी यास विश्वासात घेवुन चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की, आम्ही सर्वजन मिळुन कुंभारी येथे जाऊन आमच्या ओळखीचा हबीब सरदार पठाण रा. इंदिरा नगर, कुंभारी याच्या मदतीने कुंभारी येथील अश्विनी हॉस्पीटल येथे दरोडा टाकण्यासाठी जात होतो, असे सांगीतले.
त्यांच्या ताब्यातुन दरोड्यास लागणारे, एक लोखंडी कटर, एक लाल रंगाची घरगुती गॅस टाकी, एक ऑक्सिजन गॅस टाकी, रबरी पाईपसह प्रेशर रेग्युलेटर गॅस कटर, एक लोखंडी कटावणी, एक लोखंडी पाना, एक अॅगजेस्टेबल पाना, चार नवीन काळ्या रंगाचे टि-शर्ट, एक जुना काळा टि-शर्ट, ४ तोंडाचे काळे मास्क, ९ जोड रबरी पांढ-या रंगाचे हँन्ड ग्लोज, एक काळ्या रंगाचा स्कार्फ, एक निळ्या रंगाचा सॅक त्यामध्ये प्लॅस्टीकचे दोन धान्याचे रिकामी पोते, एक दुचाकी, २ चारचाकी गाड्या, ९ नग विविध कंपनीचे मोबाईल असे एकुण २३,६६,८५०/- मुद्देमाल जप्त केला.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...