सोलापूर – दि. ०५ मे २०२४ रोजी, प्रदीप चिल्ला यांचा वाढदिवस असल्याने, सकाळी ११:०० वाजण्याचे सुमारास, फिर्यादी पदमावती प्रदीप चिल्ला, त्यांचे पती आणि दोन मुली असे सर्वजण मिळून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी घराला आणि गेटला कुलूप लावून गेल्या होत्या. देवदर्शन आटोपून, त्या जूळे सोलापूरातील राहते घरी, दुपारी ०२:१५ वा.चे सुमारास परत आल्या असता, त्यांना गेट आणि घराचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात इसम घरात शिरल्याचे दिसून आले. फिर्यादी आणि त्यांची मुलगी निरजा यांनी बेडरुममध्ये जावून पाहिले असता, एक इसम घरात चोरी करीत असताना पाहिले. सदर अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांचे मुलीस धक्का मारला आणि चोरी केलेले सोन्याचे दागिने सोबत घेवून पळून गेला. सदर घटनेबाबत यातील फिर्यादी पदमावती चिल्ला यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे दिलेल्या फिर्यादी वरुन अज्ञात चोरटया विरुध्द दिवसा घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा घरफोडीचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा हा दिवसा भर लोकवस्ती मध्ये घडल्याने, गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचेसह घटनास्थळास भेट दिली आणि घरफोडीचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शन केले.
त्याअनुषंगाने गुन्हे शाखेडील सपोनि दादासो मोरे आणि पथकातील पोलीस अंमलदार है तांत्रीक पुरावे आणि बातमीदारा मार्फत गुन्हा उघडकीस आणण्याच्या कसोशीने प्रयत्न करीत होते, दि. २१ मे २०२४ रोजी सपोनि दादासो मोरे याचे पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार आणि संदीप जावळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ” रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार बाबू खाजप्पा मुंगली याने काही दिवसापूर्वी जुळे सोलापूरात दिवसा घरफोडी केलेली आहे”. सपोनि मोरे आणि पथकाने बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीची, तसेच कौशल्याने मिळवलेल्या तांत्रीक माहितीची खातरजमा करुन, सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार बाबू मुंगली यानेच केला असल्याची खात्री केली. त्यानंतर मिळाले बातमी प्रमाणे सपोनि मोरे आणि पथकातील अंमलदार यांनी आरोपी नामे बाबू खाजप्पा मुंगली याची गोपनीय रित्या माहिती काढून, सापळा लावून त्यास त्याचे राहते घराचे परिसरातून ताब्यात घेतले.
सदर इसमाकडे केले तपासात त्याने, दि.०५ मे २०२४ रोजी जुळे सोलापूरातील फिर्यादी यांचे बंद घरात दिवसा शिरून चोरी केल्याचे कबूल केले. त्यामुळे त्यास गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली. गुन्हयाचे तपासात आरोपीकडून एक पाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण आणि एक दिड तोळा वजनाचे नेकलेस असे साडे सहा तोळे वजनाचे रु. ६,२५,०००/- (सहा लाख पंचवीस हजार/-) किंमतीचे दागिने हस्तगत केले आहेत. सपोनि मोरे आणि त्यांचे तपास पथकाने कौशल्याने आणि अथक परिश्रमाने गंभीर स्वरुपाचा गुन्हा अल्पावधीतच उघडकीस आणलेला आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...