सोलापूरच्या मनिष (आण्णा) काळजे यांचा कार्यप्रवास शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी एक नवीन आशा बनला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीच्या आधारावर, त्यांनी आपल्या निष्ठावान शिवसैनिकत्वाचा आदर्श ठेवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ (भाई) शिंदे यांच्या मार्गदर्शनात, काळजे यांनी सुमारे ६० कोटी रुपयांचा निधी आणून सोलापूरच्या विकासाला गती दिली आहे.
“लाडकी बहीण” योजनेअंतर्गत, २५००० हून अधिक गरजू मातांना मदतीचा हात देत, त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे. जिल्हाप्रमुख म्हणून संघटन वाढीसाठी शहर व जिल्ह्यात त्यांनि मेहनत घेतली आहे.
काळजे यांची व्यक्तिगत मदत, रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ देणे आणि सामाजिक उपक्रम राबवणे हे त्यांच्या कार्याचे काही महत्त्वाचे पैलू आहेत. नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देत, त्यांनी अनेक लक्षवेधी आंदोलने आयोजित केली आहेत, ज्यामध्ये न्याय मिळवून दिला आहे.
त्यांच्या कर्तृत्वामुळे, एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाने मनिष (आण्णा) काळजे यांचे नाव शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी प्रबळ दावेदार म्हणून समोर आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...