सोलापूर – आपचे राष्ट्रीय नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांची ED मार्फत झालेल्या अटकेच्या विरोधात आम आदमी पार्टी सोलापूर चे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने प्रतिकात्मक आंदोलन केले. अनेक कार्यकर्त्यांच्या हातात बेड्या आणि साखळदंड बांधून हा निषेध प्रदर्शन करण्यात आला, आणि त्या सोबतच, ‘अटक करा अटक करा’ कट्टर इमानदारांना अटक करा, ‘मोदी जब भी डरता हे’ ईडी को आगे करता हें, ‘मोदी तेरी तानाशाही नही चलेगी, नही चलेगी. अश्या अनेक घोषणा देण्यात आल्या.
भारतीय जनता पार्टी हे सुढबुद्धीने कार्यवाही करीत आहे. 10 तास झालेल्या रेड मध्ये काहीही पुरावा मिळाला नसताना देखील संजय सिंह यांना अटक करण्यात आला. सुप्रीम कोर्टाने ईडी ला फटकारून देखील सरकार तर्फे ईडीचा गैरवापर हे सुरूच आहे. मोदी सरकार हे आम आदमी पार्टीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे घाबरून हे असे कार्यवाही करीत आहे. असे आम आदमी पार्टीचे पदाधिकारी बोलताना म्हणाले.
यावेळी आम आदमी पार्टी सोलापूर शहर कार्याध्यक्ष निहाल किरनळ्ळी, ऍड. खतीब वकील, ऍड. सागर पाटील, निलेश संगेपाग, श्रीकांत वाघमारे, मल्लिकार्जुन पिलगेरी, जुबेर हिरापुरे, रविकांत शिरगिरे, अश्विनी गायकवाड, सुषमा फडतरे, राजश्री जालनापुरे, अल्ताब तांबोळी, रहीम शेख, आनंद जाधव, विनायक पवार, विनय पागुंडा, शंकर चालवादी, अनिल वाले, दत्तात्रय हुचे, दिगंबर पांढरे, डॉ. समीर शेख, मेहमूद गब्बूरे, जफर मदणी, माझहरखान मनगोळी, भारत अली, प्रसाद बाबानगरे, राजू वनकडे आदी उपस्थित होते.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...