सोलापूर – रूपाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात ललिता पंचमीदिनी हजारो भाविकांची गर्दी होती. आई राजा उदेऽऽ उदेऽऽ, सदानंदीचा उदेऽऽ उदेऽऽच्या जयघोषाने अवघी मंदिर परिसर दुमदुमली. मंदिरात दिवसेंदिवस भाविकांच्या गर्दीत वाढ होत आहे.
सोमवारी, रूपाभवानी मंदिरात पहाटे चार वाजता काकड आरती, सकाळी दहा वाजता श्रीखंड, दही, दूध, पंचामृतचे अभिषेक करण्यात करून महापूजा करण्यात आली.
संध्याकाळी ललिता पंचमीनिमित्त देवीच्या नित्योपचार पूजेनंतर विधिवत कुमकुमर्चना कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने पार पडला. यावेळी शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. रात्री देवीचा महापूजेनंतर छबिना मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते. देवीच्या चौथ्या आणि पाचव्या माळेला देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली असून दररोज विधिवत धार्मिक विधी पूर्ण केले जात आहेत.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...