सोलापूर – AIMIM शहर आणि जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली AIMIMच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी सोलापूर जिल्हाधिकारी यांना देशातील कोणत्याही धर्माच्या पवित्र ग्रंथाचा अपमान हा सर्वसमावेशक समाजासाठी अत्यंत घातक आहे, अशा कृत्यांमुळे समाजात तणाव वाढतो आणि शांतता व सुव्यवस्था धोक्यात येते, सोशल मीडियावर धर्मग्रंथाबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे पोस्ट करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कारवाई करावी, त्यांचे ट्विटर अकाउंट बंद करावेत आणि भारतीय दंड विधान कायद्यांनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली.
तसेच मालेगाव मध्ये AIMIM पार्टीचे नेते आणि माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात मलिक हे गंभीर जखमी झाले आहेत. तर हल्लेखोरांना शोधून त्यांना अटक करण्यात यावे. त्यासोबतच मालेगावात गुंडाराज सुरू आहे अश्या अनेक घटना वारंवार मालेगाव मध्ये घडत आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोलापूर AIMIMच्या वतीने करण्यात आली.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...