सोलापूर ग्रामीण घटकातील अकलुज पोलीस ठाणे येथे निखील शिरसट आणि त्याच्या टोळीतील साथीदारा विरुद्ध मालमत्ता जबरीने घेणे, घातक हत्याराचा वापर करून इच्छापुर्वक दुखापत पोहचवणे, इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवणे, मालमत्तेचे नुकसान करून आगळीक करणे, तलवार काठया या सारखे हत्यार घेवून गैर कायदयाची मंडळी जमवुन दंगा करणे, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करून समाजात दहशत पसरवली होती. टोळी प्रमुख व टोळी सदस्यावर वेळोवेळी कारवाई करून देखील सुधारणा न झाल्याने सराईत गुन्हे करणा-या निखील शिरसट आणि टोळीतील ०५ इसमाना पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर जिल्हयातून एका वर्षाकरीता हद्दपार केले आहे. माळशिरस तालुक्यात तसेच आजुबाजूच्या परिसरात निखील शिरसट याने टोळी निर्माण करून स्वतः तसेच एकटयाने तरी कधी टोळीच्या साथीदारा सोबत गुन्हे करून दहशत आणि भय निर्माण केले होते.
तरी याव्दारे नागरीकांना आव्हान करण्यात येते की, नमुद हद्दपार इसम हे सोलापूर जिल्हयात वावरत असल्याचे आढळल्यास त्याबाबत ची माहिती तत्काळ पोलीस ठाणेस आणि नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण येथे कळवावे.
शिरीष सरदेशपांडे सी, हद्दपार प्राधीकरण तथा पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी हद्दपारीचे आदेश पारित केले आहे. अपर पोलीस अधिक्षक, हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. सुहास जगतपा, पो.नि. गायकवाड, तसेच सपोफी जाधवर, पो.ना. अनिस शेख, स्थानिक गुन्हे शाखा, पो.हे.कॉ. बकाल, पठाण आणि इतर अंमलदार यांनी कारवाईत संयुक्तपणे कामकाज केला आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...