सोलापूर – इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशनच्या वतीने दि. २४ जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीत सोलापूर महानगरपालिकेद्वारा स्मार्ट सिटी अंतर्गत इंद्रधनु जवळील मैदानावर इलेक्टरोचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे, हा इलक्ट्रोचा २४वे वर्ष असून या प्रदर्शन मध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्यूटर, टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलार सिस्टम, फिटनेस इक्विपमेंटस् आदिचे प्रदर्शन होणार आहे.
यंदा इलक्ट्रो प्रदर्शनाचे शार्प हे मुख्य प्रायोजक असून प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार दि. २४ जानेवारी रोजी सायं. ५.०० वाजता वसंत जोशी बिझनेस हेड, शार्प बिझनेस सिस्टम्स् इंडिया लि. यांच्या शुभहस्ते आणि अजित बो-हाडे, डीसीपी, पोलीस आयुक्तालय, सोलापूर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे,
७ दिवस चालणारा इलेक्ट्रो २०२४ हा प्रदर्शन दररोज दु. ४ ते रा. ९.३० आणि रविवारी स. ११ ते रा. ९.३० पर्यंत चालणाऱ आहे, या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलईडी, फ्रिज, साईड बाय साईड फ्रिज, एअर कंडीशनर, म्युझिक सिस्टीम, वॉशिंग मशीन, डिश टिव्ही, मायक्रोव्हेव ओव्हन, व्हॅक्यूम क्लिनर, एअर कंडीशनर, सोलर सिस्टीम, गॅस गिझर, मोबाईल, आय पॅड, टेलीफोन, मिक्सर, फुड प्रोसेसर, आटा चक्की, एअर कुलर, वॉटर प्युरीफायर, स्टॅबीलायझर, चिमणी हुड, कॉम्प्युटर, फिटनेस इक्विपमेंटस् इत्यादी या प्रदर्शनामध्ये उपलब्ध असतील, ग्राहकांना विविध नमुन्यात आणि विविध रंगात आकर्षक किंमतीत निरनिराळ्या योजनांखाली वस्तू खरेदी करता येईल, तसेच बजाज फायनान्स आणि इतर फायनान्सच्या माध्यमातून शुन्य टक्के ०% व्याज दराने कर्जाची उपलब्धता देखील केली जाईल.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...