नवजात बाळाच्या मृत्यूच्या दहा महिन्यांनंतर कादरी हॉस्पिटलच्या 3 डॉक्टरांवर अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल झाले आहे.
सोलापूर – कादरी हॉस्पिटलमध्ये मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याच्याकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्या बाळाच्या बेंबीजवळ संसर्ग होऊन बाळाचा मृत्यू झाला, या प्रकरणी बाळाची आई आयेशा गफार शहापुरे (वय २२, रा. साईनाथ नगर, नई जिंदगी) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे, यावरून डॉ. खलील कादरी, डॉ. झरीन कादरी, डॉ. ऐमन कादरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
आयेशा या गर्भवती असताना बाळंतपणासाठी, १२ जुलै २०२२ मध्ये कादरी हॉस्पिटल येथे दाखल झाल्या होते, दोन दिवसांनी त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला, बाळाच्या पोटाजवळ काळे निळे डाग दिसू लागल्याने आयेशा यांनी याची माहिती डॉक्टरांना सांगितली, पण डॉक्टरांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे आयेशा यांनी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करून बाळाला शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले, संसर्ग कमी न झाल्याने त्या बाळाचा मृत्यू झाला, शिवाय आयेशा यांना घातलेल्या टाक्यातूनही पाणी येत असल्याने त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, त्यानंतर आयेशा यांना पैसे भरण्यास सांगितले पण फिर्यादीकडे पैसे कमी होते, यामुळे डॉक्टरांनी त्यांना ड्रेसिंग देखील केले नाही, अशी फिर्याद आयेशा यांनी दिली आहे, दरम्यान आयेशा यांनी कादरी हॉस्पिटलच्या डॉक्टरां विरुध्द सिव्हिल हॉस्पिटलच्या समितीकडे तक्रार केली, त्या अहवालात कादरी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचे सांगितले, यामुळे कादरी हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला आहे, पुढील तपास पोलीस करत आहेत.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...