पुणे – प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने एका तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार केले, दर्शना पवार हत्याप्रकरण ताजे असताना पुण्याच्या सदाशिव पेठेत धक्कादायक घटना घडली आहे. महाविद्यालयीन तरुणीवर पुण्यातील सदाशिव पेठ येथे एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सदाशिव पेठेतील पेरू गेट पोलीस चौकी पासून अवघ्या काही अंतरावर हा प्रकार घडला आहे, प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार केले, अचानक झालेल्या या हल्ल्याने ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या घटनेनंतर तरुणाला जमावाने चांगलाच चोप दिला. आणि त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे, घटनास्थळी पोलीस दाखल झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...