सोलापूर – ग्रामीण जिल्हयातील पाहिजे आरोपी पकडण्याकरीता शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सुरेश निबांळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांना सुचना दिल्या होत्या. सदर सुचने प्रमाणे सुरेश निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शाखेकडील पथक प्रमुख आणि त्यांचा पथकास पाहिजे आरोपीस जेरबंद करणेबाबत सुचना दिल्या.
त्याप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक, सुबोध जमादाडे आणि त्यांचे पथक मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत बोराळे येथे आले असता, गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, दरोडयातील पाहिजे आरोपी हा सिध्दापूर येथुन बोराळे गावाकडे त्याची काळे रंगाची होंडा शाईन मोटार सायकल वरुन येणार आहे. सदर बातमी प्रमाणे पोउपनि जमदाडे आणि त्यांचे पथकाने सिध्दापूर ते बोराळे जाणा-या रस्त्यावर सापळा रचुन पाहिजे आरोपीत यास ताब्यात घेतले. सोलापूर जिल्हयातील पाहिजे आरोपीचे अभिलेख पडताळणी करता सदर आरोपीत हा अनेक गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन झाले. सदर आरोपीतास पुढील कारवाई करीता मंगळवेढा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले असुन पुढील तपास मंगळवेढा पोलीस करीत आहे.
सदर आरोपी हा रेकॉर्ड वरील आरोपी असुन त्याचे विरुध्द खुनासह दरोडा, दरोडा, फसवणुक सारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. नमुद गुन्हयामध्ये अटक टाळण्यासाठी आरोपी हा मागील 15 वर्षा पासुन त्याचे अस्तित्व लपविण्याकरीता वेगवेगळया ठिकाणी राहत होता.
सदर उल्लेखनीय कामगिरी शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण आणि हिम्मत जाधव, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांचे नेत्तृत्वाखाली पोलीस उप-निरीक्षक सुबोध जमदाडे, सहाफौज घोळवे, पोहवा परशुराम शिंदे, मपोना पल्लवी इंगळे, पोकॉ अजय वाघमारे, अन्वर अत्तार, यश देवकते, सुरज रामगुडे, मपोकॉ झळके, चापोहवा प्रमोद माने, यांनी केली आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...