सोलापूर – एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उप निरीक्षक विक्रम प्रतापसिंग रजपूत नेमणूक एमआयडीसी पोलीस ठाणे यांनी १ लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस उप निरीक्षकास ताब्यात घेतले आहे.
यातील तक्रारदार यांचे मित्र यांचेवर एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे दाखल असलेल्या गुन्हयाचा तपास हा पीएसआय विक्रम रजपुत करत होते.सदर गुन्हयामध्ये मदत करण्यासाठी व तक्रारदार यांचे मित्र यांचेवर यापूर्वीही अॅट्रोसिटी व इतर गुन्हे दाखल असून त्यांचेवर सीआरपीसी कलम १०७ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी पीएसआय विक्रम रजपुत यांनी स्वताःसाठी व पोनि राजन माने यांचे नावे म्हणून २ लाख रुपयांची लाचेची मागणी करुन तडजोडी अंती १ लाख रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची तयार दर्शवील्याचे पडताळणी कारवाईमध्ये निष्पन्न झाल्याने पीएसआय विक्रम रजपुत यांनी अयोग्यरित्या बेकायदेशीर परितोषण स्वीकारण्याचा प्रयत्न केला असल्याने त्यांना ताब्यात घेवुन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे सुरु आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...