सोलापूर – रात्रीच्यावेळी चेकपोस्ट येथन वळण घेणाऱ्या कंटेनरचा अंदाज न आल्यामूळे पाठिमागून कंटेनरला धडक दिल्यानं, एक दुचाकीस्वार बेशुद्ध झाला, त्याला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी चेकपोस्टजवळ बुधवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला.
हावटु गंगण्णा वड्यार (वय २४, रा. सातलगाव, ता. इंडी विजापूर) असे मयत तरुणाचे नाव आहे, यातील दुचाकीस्वार हावटू हे बुधवारी काही कामानिमित्त सोलापूर येथे दुचाकीवरून आले होते, काम आटोपून रात्री ते परत सातलगावकडे निघाले होते, नांदणी चेकपोस्ट येथे पावणेअकराच्या सुमारास, तेथे वळणाऱ्या कंटेनरचा हावटू यांना अंदाज आला नाही, त्यामुळे त्यांची दुचाकी कंटेनरला पाठीमागून धडकली, यात ते खाली पडल्याने जखमी होऊन बेशुध्द झाले. बेशुध्दावस्थेत त्यांना उपचारास शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच ते मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, या घटनेची सिव्हील पोलीस चौकीत नोंद झाली आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...