सोलापूर – दि.०८ नोव्हेंबर २०२३ रोजी सायकांळी ०४.०० वा. चे सुमारास दोन बुरखादारी महीला, कल्याण ज्वेलर्स, व्ही.आय.पी. रोड, मोदी कब्रस्थानसमोर, सोलापूर येथील ज्वेलरी शॉपमध्ये जावून, हातचालाखीने सेल्समनची फसवणूक करून सोन्याच्या दोन बांगड्या घेवून निघून गेल्याने फिर्यादी यांचे तक्रारीवरून सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होत.
त्या अनुषंगाने सपोनि विजय पाटील, पोउपनि अल्फाज शेख आणि त्यांचे तपास पथकाने घटनास्थळापासून सुमारे ८० सी सी टी व्ही फुटेजची पडताळणी करुन आरोपीचा शोध घेत होते. दिनांक १८ नोव्हेंबर रोजी पोउपनि अल्फाज शेख यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, एक बुरखाधारी महीला चोरीचे सोने घेवून अशोक चौक परिसरात वावरत आहे. सपोनि विजय पाटील, पोउपनि अल्फाज शेख आणि त्यांचे तपास पथकाने सदर बातमीची शहानिशा करून, अशोक चौक परिसरात सापळा लावून, सदर महीलेस ताब्यात घेतले, कायदेशिररीत्या महिलेची अंगझडती घेतली असता, तिच्या ताब्यात कल्याण ज्वेलर्स येथून चोरलेले ३१.५० ग्रॅम वजनाचे १८९,५२०/- रूपये किमतीचे सोन्याचे दागिने मिळून आले. सदर महीलेकडे अधिक विचारपूस करता तिने तिचे नाव नाजिया आसिफ शेख राहणार नई जिंदगी, सोलापुर असे सांगून, तिने व तिची आई- मुमताज नजिर शेख, रा. समाधान नगर, सोलापूर असे दोघींनी मिळून, कल्याण ज्वेलर्स येथून सेल्समनची फसवणूक करून, सोने घेवून गेल्याची कबुली दिली. तसेच सदर गुन्हा करतेवेळी, तिचा भाऊ अब्बास नजिर शेख, रा. समाधान नगर, सोलापूर हा कल्याण ज्वेलर्सच्या बाहेर पाळत ठेवून उभा असल्याचे सांगितल्याने, सदर गुन्हयात वरील नमूद तिन आरोपीचा सहभाग निष्पन्न झाला आहे. नमूद महीला आरोपी नाजिया आसिफ शेख हिला पुढील कारवाईकरीता सदरबझार पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आहे. महीला आरोपी मुमताज शेख व अब्बास नजीर शेख यांचा शोध सुरू आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...