सोलापूर – पंढपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे रोपळे ता. पंढरपूर येथे विलास विशंभर भोसले, रा. रोपळे ता. पंढरपूर जि. सोलापूर यांचे राहते घराचे मुख्य दरवाजाचे कुलुप तोडून घरातील लोखंडी कपाट उचकटून सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 5,49,000 रू. किंमतीचा ऐवज चोरून नेला असे, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण आणि हिंमत जाधव, अपर पोलीस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयातील मालाविषयी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन आणि सुचना दिल्या. त्यावरून पोनि निंबाळकर यांनी गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची बैठक घेवून त्यांना मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणेकामी सुचना केल्या होत्या.
सपोनि शशिकांत शेळके आणि त्यांचे पथक पंढरपूर शहरात हजर असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे रोपळे ता. पंढरपूर येथील घरफोडी चोरीचा गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार हा त्याचे इतर साथिदारांसोबत केला असून तो क्वालीस कार वाहनासह पंढरपूर शहरातील अहिल्या चौकात थांबलेला आहे. त्यावरून पोलीस पथकाने तेथे सापळा लावून त्यास ताब्यात घेवून कौशल्यपूर्ण तपास केले असता, त्याने उपरोक्त गुन्हा तसेच मागील काही दिवसामध्ये मौजे रोपळे, बाभूळगांव, देगांव, पटवर्धन कुरोली, आढीव इत्यादी ठिकाणी घरफोडी चोरी केल्या असल्याचे सांगितले. तसेच मौजे खर्डी ता. पंढरपूर आणि आलेगांव ता. माढा येथील साखर कारखाना स्टोअर्सचे गोडावून फोडून साखर कारखान्यातील मशनिरी साहित्य चोरल्याचे सांगितले. त्याचेकडे अधिक तपास करून त्याचेकडून एकूण 08 घरफोडी गुन्हयातील, 114 ग्रॅम वजन सोन्याचे दागिने, 260 किलो साखर कारखान्यातील मशिनरी साहित्य जप्त केली आहे. तसेच त्याचेकडे असलेली क्वालीस कार, ही देखील चोरीच्या पैशातून घेतलेले, त्याचप्रमाणे चोरीचे गुन्हे करण्यासाठी वापरलेले विना नंबरचे पिकअप जिप, असा एकूण 12,34,937/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याला पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आले आहे. त्याचे विरूध्द सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्हयात मालाविषयी गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयांचा तपास चालु असून त्याचेकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, हिंमत जाधव, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, सफौ ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, समीर शेख, महिला अंमलदार पल्लवी इंगळे यांनी बजावली आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...