सोलापूर – दि. 30 जानेवारी 24 रोजी विजापुर रोड जय मल्हार हाटेल जवळ हिरजला जाणाऱ्या रस्त्यावर दोन अनोळखी इस्मांनी एका व्यतीस चाकुचा धाक दाखवुन त्यास जबरदस्तीने ए टी एम मधुन 80000/- रुपये काढून घेतले होते त्याबाबत तक्रारदार, यांनी फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केले होते.
सदर गुन्हयाची गांभीर्य ओळखुन, सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेचे पो.ऊप.नी. अल्फाज शेख आणि त्यांचे पथक घटनास्थळ आणि आजुबाजुचे परीसरातील सि.सि. टी.वी फुटेजची पडताळणी केली होती, सदर प्राप्त झालेली सि.सि.टी.वी फुटेजच्या आधारे, सोलापूर शहरामध्ये आरोपीचा शोध घेत अस्ताना पो.उप.नि. अलफाज शेखे आणि त्यांचे पथकास माहिती मिळाली की फिर्यादीस मारहाण करून लुटणाऱ्या दोन जानांणपैकी एक इसम सी.एन.एस हॉस्पीटल जवळ थांबला आहे.
अशी बातमी मिळताच पो.उप.नि. अल्फाज शेख आणि त्यांचे पथकाने त्या ठिकाणी सापळा लावुन, प्रेम संजय हलकवडे वय 20 या ईस्मास ताब्यात घेतले, त्याचा कडे अधिक तपास केले असता, त्याने एक साथीदार सोबत सदर गुन्हा केल्याची कबुली दिली, त्याची अंगझडतीमध्ये गुन्हयातील चोरलेली रोख रक्कम 40,000/- रुपये तसेच गुन्हयात वापरलेली चाकु आणि मोटार सायकल असे एकूण 60,000/- रुपयेचे मुद्देमाल जप्त करण्यात आले, पुढील तपास फौजदार चावडी पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कामगिरी, एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे सोलापूर शहर, प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे सोलापूर शहर, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, सोलापूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली, पो.उप.नि. अल्फाज शेख, पोलीस अंमलदार बापू साठे, भारत पाटील, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, वसीम शेख, सतिश काटे, सायबर पोलीस ठाणेकडील अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड, यांनी पार पाडली आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...