सोलापूर – शहरामध्ये गर्दीचा फायदा घेऊन, महिलांचे गळयातील मंगळसुत्र चोरी करण्याचे गुन्हे घडलेले होते, त्याचप्रमाणे सोलापूर शहरातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे, ही घडले होते, असे दोन्ही प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी, सोलापूर शहर गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी परिश्रम घेत होते.
होम मैदान येथील गड्डा यात्रेमध्ये, एका महिलेच्या गळयातील मंगळसुत्राची चोरी करून, चोरीचे मंगळसुत्र घेवून एक महिला विक्री करीता सोलापूर मध्ये येणार असल्याची गोपनिय माहिती, स.पो.नि. जीवन निरगुडे आणि त्यांचे तपास पथकास प्राप्त झाली होती, त्या अनुषंगाने स.पो.नि. जीवन निरगुडे आणि त्यांचे तपास पथक मिळालेल्या माहितीच्या प्रमाणे, एक विधिसंघर्षीत मुलगी, कालीका मंदिरच्या समोरुन जात असताना मिळुन आली, त्याला महिला पोलीस अंमलदार तांबोळी यांनी ताब्यात घेऊन, त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता, त्याने सिध्देश्वर यात्रेमधील, होम मैदान या ठिकाणी, एका महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरी केले बाबतची कबुली दिली. सदरचे ०५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे चोरीचे मंगळसुत्र, किंमत रु.२०,०००/- हे त्या विधीसंघर्षीत मुलीकडे मिळुन आल्याने, ते जप्त करण्यात आले आहे, त्याबाबत सदर बझार पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला आहे.
तसेच गुन्हे शाखेकडील स.पो.नि. जीवन निरगुडे आणि त्यांचे तपास पथक यांनी, सोलापूर शहरातील, मोटार सायकल चोरीचे गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन, बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीचे आधारे, आरोपी नामे अरबाज मेहबुब शेख, वय-२४ वर्षे, राहणार शास्त्री नगर सोलापूर याचेकडून, चोरीचे ०२ मोटार सायकल, श्रीराम खुबराम यादव वय २९ वर्षे, राहणार- मु. तुलसीपुर, पो. भरावन, थाना संधिला, जि. हरदोई, राज्य उत्तर प्रदेश याचेकडून चोरीचे ०२ मोटार सायकल, सुर्यकांत आप्पाराव हेलगर वय- ३९ वर्षे, व्यवसाय ट्रक ड्रायव्हर, राहणार भवानी पेठ, सोलापूर, याचेकडून चोरीची ०१ मोटार सायकल, असे एकूण ०३ आरोपींकडून, १,७०,०००/- रुपये किंमतीचे ०५ मोटार सायकल जप्त करून, ०५ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कामगिरी, एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, सुनिल दोरगे, व.पो.नि., गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. जीवन निरगुडे, पोलीस अंमलदार स.फौ. दिलीप किर्दक, वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, सतिश काटे, बाळु काळे, अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड, महिला पोलीस अंमलदार तांबोळी आणि लंगोटे यांनी केली आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...