सोलापूर तालुका,पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार, चोरून अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू तयार करणा-या इसमावर ऑपरेशन परिवर्तनच्या अनुषंगाने कारवाई करण्या करीता मौजे मुळेगाव तांडा ता.द.सोलापूर शिवारात पेट्रोलिंग करीत असताना, मुळेगाव तांडयाच्या पुर्व बाजुस असलेल्या चिल्लारीच्या झाडाझुडपाच्या आडोशाला अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करण्याच्या साहित्यासह बाळगुन असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी छापा टाकुन कारवाई केली.
चोरून अवैधरित्या चालणा-या देशी दारूच्या हातभट्टयावर टाकलेल्या छापा कारवाईत 1 लाख 4 हजार 500 रूपये किंमतीचे 2000 हजार लिटर गुळमिश्रीत रसायन, 10 प्लॅस्टीक बॅरेल मध्ये भरून ठेवलेली गावठी हातभट्टी दारू तयार करण्या करीता लागणारे साहित्य हातभट्टी उध्दवस्त करून प्लॅस्टीक बॅरेल जागीच फोडुन गुळमिश्रीत रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले आहे. तसेच एका इसमा विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्या कलम 65 फ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्या गुन्हयाचा तपास सोलापूर तालुका पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार याचेकडुन होत आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...