सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार हे चोरून अवैधरित्या हातभट्टी दारू बाळगणा-या इसमा विरूध्द कारवाई करण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना एका गोपनिय बातमीदारा कडून करवी मौजे मुळेगांव तांडा ता.द.सोलापूर येथील सालकी वेअर हाऊसच्या पुर्व बाजुस चिल्लारीच्या तसेच मुळेगाव तांडयाच्या दक्षिण बाजुस असलेल्या चिल्लारीच्या झाडाझुडपाच्या आडोशाला आणि मौजे वरळे गाव तांडयाच्या पुर्व बाजुस असलेल्या शेत बांधाजवळ चोरून अवैधरित्या हातभट्टी दारूच्या रबरी टयुबा, प्लॅस्टीक घागरी, बॅरेल तसेच हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य काही इसम बाळगुन आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती त्या नुसार मिळालेल्या बातमी प्रमाणे सदर तीनही ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली आहे.
तसेच मुळेगाव ता.द.सोलापूर येथील हनुमान मंदीराच्या समोरील रोडवर दोड्डी गावाकडुन येणा-या रोड वरून एक इसम त्याचे ताब्यातील सुझुकी कंपनीची दुचाकी मोटार सायकली वरून 6 काळया रंगाच्या रबरी टयुबा त्यामध्ये 12 हजार रूपये किंमतीची 240 लिटर हातभट्टी दारू बेकायदेशीररित्या वाहतुक करीत असताना मिळुन आला आहे.
वरील ठिकाणी केलेल्या हातभट्टी दारूच्या रबरी टयुबा आणि हातभट्टी दारू तयार करण्याच्या साहित्य जवळ बाळगुन असलेल्या छापा कारवाईत, एकूण 2 लाख 32 हजार 150 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून केलेल्या कारवाईत एकूण 5 इसमा विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...