सोलापूर – बलकरच्या खाली येऊन एका 42 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 8 जून 2024 रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शांती चौक येथे ऐका मोटरसायकल सवारास सिमेंट बलकरने जोराची धडक दिली. सुनील शिवाजी पवार वय वर्ष 42 राहणार स्वागत नगर सोलापूर असे मयताचे नाव आहे.
हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये मयत सुनील पवार हे गाडीच्या मागच्या चाकात येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह श्रवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिविल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले आहे.
या अपघातामुळे पुन्हा सोलापूरकरांच्या मनात भीती निर्माण झाली असून जड वाहतूक हे अजून किती जणांचे बळी घेणार असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...