सोलापूर – दिनांक 11 मार्च 2024 रोजी सांयकाळी 7 वा. मौजे शीरभावी, ता. सांगोला गावाचे लगत असलेल्या वन विभागाच्या जागेत एका 55-60 वर्षीय महिलेचा मृतदेह दगडाने आणि धारदार शस्त्राने वार करुन खुन केलेल्या आवस्थेत मिळुन आला होता, सदर बाबत सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील मयत व्यक्ती हि वृध्द महिला असल्याने सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक, आणि अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांना नमुद गुन्हा उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या.
सदर सुचने प्रमाणे सहा.पो. निरीक्षक धनंजय पोरे आणि पो.उप. निरीक्षक सुरज निंबाळकर यांनी पथकासह सांगोला परिसरातुन अज्ञात मयत महिलेची माहिती प्राप्त करुन तिची ओळख पटवली, सदर मयत महिलेचे नांव व्दारका बबन माने, रा. धायटी, ता. सांगोला असे असुन ती तिच्या दोन मुला समवेत राहत असल्याचे समजले. सदर महिला हि दिनांक 11 मार्च 2024 रोजी धायटी ता. सांगोला येथील तिचे घरातुन त्याच परिसरात राहणारे तिच्या भावाकडे गेली असल्याचे तपासात निष्पन्न झाले, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर बाबत सखोल तपास करुन मयत महिला हिचे बाबत अधीक माहिती प्राप्त केली असता सदर महिलेच्या मृत्यु नंतर तिच्या सख्या भावाचे आणि त्याच्या मुलांचे वर्तन संशयास्पद असल्याचे लक्षात आले. सदर बाबत अधीक तपास करता मयत हिचा भाचा हा गुन्हा घडल्यापासुन आपले अस्तीत्व लपवुन राहत असलेचे लक्षात आले.
सदर गुन्हयातील संशयीत आरोपी याचा पंढरपुर, सांगोला, अक्कलकोट येथे गोपनीय बातमीदार मार्फत शोध घेत होते. दिनांक 11 मार्च 2024 रोजी गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हा अक्कलकोट मंदिर परिसरामध्ये येणार आहे, माहिती प्राप्त होताच दोन्ही पथकाने अक्कलकोट येथील मंदिर परिसरामध्ये तसेच बाजार पेठेत शोध घेवुन आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीस विश्वासात घेवुन त्याच्याकडे गुन्हया संदर्भात कौशल्यपुर्ण तपास केला असता, सदर आरोपीने त्याची मयत आत्या व्दारका बबन माने हि त्याच्या कुंटुबीयावर जादुटोणा करीत होती आणि त्यामुळे आपल्या कुंटुबाची काही प्रगती होत नसल्याच्या गोष्टीचा मनात राग धरुन दिनांक 11 मार्च 2024 रोजी सायंकाळी मौजे शीरभावी, ता. सांगोला गावाचे लगत असलेल्या वन विभागाच्या जागेत घेवुन जावुन चाकुने वार करुन आणि दगडाने डोके ठेचुन खुन केल्याचे कबुल केले आहे. सदर आरोपीस अटक केली असुन, पुढील तपास पोलीस निरीक्षक खणदाळे सांगोला पोलीस ठाणे हे करीत आहेत.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...