सोलापूर – अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूर येथील बंद पडलेल्या चंदनाच्या कारखान्यात जुगार अड्डा चालू होता, या जुगार अड्ड्यावर सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून या छाप्यात सव्वा चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १७ आरोपींना ताब्यात घेण्यात आला.
अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे हद्दीतील सिन्नर येथे बेकायदेशीर जुगाराचा अड्डा चालवला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या बातमीच्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे आणि त्यांच्या पथक, गावातील बंद पडलेल्या चंदनाच्या कारखान्यामध्ये असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. सदर छापा कारवाईत जुगार खेळणारे १६ आरोपी आणि जुगार चालवणारा आरोपी असे एकूण १७ आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत, त्यांच्याकडून २ लाख ५४ हजार ५७० रुपये रोख रक्कम हस्तगत केली असून सदर घटनास्थळावरून जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य आणि आरोपी यांचे एकूण २४ मोटर सायकली असा एकूण १४ लाख २५ हजार ७० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहा. पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, श्रेणी पोसई, राजेश गायकवाड, सपोफौ श्रीकांत गायकवाड, निलकंठ जाधवर, पोहवा सलीम बागवान, विजयकुमार भरले, पोना रवी माने, चापोशि दिलीप थोरात यांनी पार पाडली आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...