सोलापूर – दुपारच्या वेळेस मौजे गावडी दारफळ ता. उत्तर सोलापूर या ठिकाणी एका अज्ञात चोराने दोन बंद घराचे कुलुप तोडुन घरफोडी करुन सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे एकुण 8,35,000/- रुपये किंमतीचे ऐवज चोरी केले होते, सदर बाबत तक्रारदार याने सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप-निरीक्षक राजु डांगे यांचेकडे देण्यात आले होते. पोलीस उप-निरीक्षक राजु डांगे यांनी तपासा दरम्यान रेकॉर्डवरील दिवसा घर फोडी करणारे अटक आरोपीचे अभीलेख पडताळणी करत असताना, गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हा लातुर येथील गुन्हे अभीलेखावरील आरोपीने केले आहे. सदर बातमीवरुन नमुद आरोपीस अटक करण्यात आला.
अटकेत असलेल्या आरोपीची सखोल तपास करता त्याने हा गुन्हा त्याचे साथीदारा सोबत केल्याची कबुली दिली. आरोपी याच्याकडुन गुन्ह्यातील चोरी केलेले एकुण 8,35,000/- रु. किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.उप. निरीक्षक राजु डांगे, स्थानिक गुन्हे शाखा हे करीत असुन, आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
नमुद आरोपी याचे गुन्हे अभीलेख पाहता त्याच्यावर पिंपरीचिंचवड, लातुर, कर्नाटक मध्ये बिदर, हुमनाबाद असे अनेक ठिकाणी घर फोडीचे 20 गुन्हे दाखल आहेत, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी मुळे एक सराईत गुन्हेगारास पकडण्यात यश आलं.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...