सोलापूर – मध्यरात्रीच्या सुमारास होटगी रोडवरील महावीर चौकातील रस्त्याच्या दुभाजकला धडकून एका २१ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला, सुरज पवार (वय २१, रा. पूनम नगर, जुळे सोलापूर) असे त्या तरूणाचे नाव आहे, गुरूवारी मध्यरात्री हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
गुरूवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास सुरज हा दुचाकीवरून जात असताना महावीर चौकातील दुभाजकाला धडकला, यात त्याच्या डोक्याला, तोंडाला गंभीर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला, त्याला उपचारासाठी लगेच उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय सोलापूर येथे दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकी येथे झाली आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...