सोलापूर – दोन लहान मुलांची हत्या करून मातेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना विजापूर रोड परिसरातील राजस्व नगरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. ज्योती सुहास चव्हाण (वय २७) तिची दोन मुले अथर्व चव्हाण (वय ३.५) आणि मुलगी आर्या चव्हाण (वय २) वर्षे अशी मयतांची नावे आहेत.
आज सायंकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. घरातील छताला ज्योती चव्हाण हिचा मृतदेह ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, तर अथर्व आणि आर्या यांचे मृतदेह घरात आढळले. त्यांचा गळा दाबून हत्या करून मातेने आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मयत ज्योती हिचे पती सुहास चव्हाण हे एसटी महामंडळात नोकरीस असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या बद्दल अधिक तपास विजापूर नाका पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...