विजापूर रोड येथील कंबर तलाव या ठिकाणी असलेले रेल्वे रुळाखाली एका बँक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली ,याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 13 मे 2023 रोजी दुपारच्या सुमारास सुनील नगर एमआयडीसी रोड येथील राहणारे एका बँक कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळाखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
वीरेश श्रीपाद जीर वय वर्ष अंदाजे 30 राहणार सुनील नगर एमआयडीसी रोड सोलापूर असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, आणि सदर मृतदेहास सोलापुरातील शासकीय रुग्णालया अर्थात सिविल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सिविल हॉस्पिटल या ठिकाणी गर्दी केली होती.
बँक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या का केली त्याचे मागचे कारण काय या सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...