सोलापूर – विजापूर रोड येथील आनंदनगर भागात पाणी भरत असताना पाण्याच्या मोटारीचा शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. काही दिवसापूर्वीच एका १० वर्षाच्या मुलाचा पाणी भरताना शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री पुन्हा अशाच प्रकारे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. ही घटनाही अपूर्ण आणि अवेळी पाणीपुरवठ्यामुळे झाल्याने नागरिकांमधून मोठा रोष व्यक्त करण्यात येत आहे, शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नळाला पाणी आला, पाणी भरत असताना त्यांना इलेक्ट्रिक मोटरीचा शॉक लागला. शॉक बसल्यानंतर ती बेशुद्ध पडल्या, त्यांना घरातील नातेवाईकांनी उठवण्याचा प्रयत्न केला पण त्या उठल्या नाही, नातेवाईकांनी त्यांना लगेच उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला, या गलथान पाणीपुरवठ्या मूळे बळी गेल्याने नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...