सोलापूर – सहायक पोलिस आयुक्त दीपक आर्वे यांच्यासोबत रात्र वस्तीवर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल सनी राठोड यांनी धाडसाने पुढे येवून आग आटोक्यात आणली. या कामगिरीबद्दल पोलीस कॉन्स्टेबल सनी राठोड यांचे कौतुक होत आहे.
पोलीस कॉन्स्टेबल सनी तुकाराम राठोड हे सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे यांचे आरटीपीसी म्हणून कार्यरत आहेत. दि. 7 मे 2023 रोजी रात्री शहरात गस्त सुरू होती. सहायक पोलिस आयुक्त दीपक आर्वे हे विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे भेट देण्यासाठी गेले होते. दिनांक 07/05/2023 रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास विजापूर नाका पोलीस ठाणे समोरील सोसायटीमध्ये नेताजी सुभाष बिल्डिंगमध्ये आग लागली होती. आगीचा प्रचंड भडका उडाला होता. आगीची माहिती कळताच पोलीस कॉन्स्टेबल सनी राठोड तिथे पोचले. तेथील नागरिक धुमाळ यांना उठवले. त्यांच्या घराच्या भिंतीवरून धुमाळ यांच्या मदतीने पाण्याच्या बोर चालू करून पाईपने पाणी मारून आग आटोक्यात आणली.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...