सोलापूर – अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण या ठिकाणी नेमणूक असलेले पोलीस शिपाई दादासाहेब बोडके 5000/- रुपयेची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
यातील मिळालेली माहिती अशी की तक्रारदार वापरत असलेला मोबाईल फोन चोरीचा आहे असे सांगून तक्रारदार याच्या विरुद्ध मोबाईल फोन चोरीचा गुन्हा दाखल न करण्याकरिता पोलीस शिपाई बोडके यांनी तक्रारदारा कडे 5000/- रुपये लाचेची मागणी केली, याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर कार्यालयकडे तक्रार दाखल केली.
याप्रकरण्याची पडताळणी आणि शहानिशा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या वतीने लावण्यात आलेला सापळ्यात पोलीस शिपाई बोडके स्वतः 5000/- रुपयेची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले, याबद्दल अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे सोलापूर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कामगिरी अमोल तांबे, पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. पुणे, डॉ. शीतल जानवे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे,
गणेश कुंभार, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. सोलापूर, यांच्या मार्गदर्शनाखाली, उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. सोलापूर, पो.हे.कों. अतुल घाडगे, पो.ना. स्वामीराव जाधव, चा.पो.ह. राहुल गायकवाड, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारा संबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...