सोलापूर – एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे सोलापूर शहर येथील पोह इस्माईल बागवान यांच्यावर ४,०००/- रुपये लाचेची मागणी केले बाबत गुन्हा दाखल
यातील तक्रारदार काम करत असलेल्या आणि ठेकेदार यांच्या मधील आर्थिक देवाण घेवाणीचे वादातुन ठेकेदार यांनी तक्रारदार याची ताब्यातील मोटारसायकल जबरदस्ती घेवुन गेला होता, सदरबाबत तक्रारदार एमआयडीसी पोलीस ठाणे येथे ठेकेदाराविरुध्द तक्रारदेण्यासाठी गेले असता, तेथे पोह बागवान यांनी तक्रारदार यांची तक्रार ऐकूण घेवुन, पोह बागवान यांनी सदरची मोटार सायकल नमूद ठेकेदार यांच्या ताब्यातुन घेवून एमआयडीसी पोलीस ठाणे येथे उभा करुन ठेवली, तक्रारदार यांनी सदरची मोटार सायकल परत मिळण्या करीता पोह बागवान यांना विनंती केली असता, पोह बागवान यांनी ४०००/- रुपये लाचेची मागणी केले, असल्याबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूरकडे तक्रार प्राप्त झाली होती.
सदर प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि.०४.०५.२०२३ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता यातील लोकसेवक पोह इस्माईल बागवन, यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांच्या मोटारसायकल कोणतीही कारवाई न करता ताब्यात देण्यासाठी ४०००/- रू लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे, सदर प्रकरणी लोकसेवक पोह इस्माईल बागवान यांच्या विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्हयातील नागरीकांना अहवान करण्यात येते की, भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...