सोलापूर – बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या १२ मॉडीफाईड बुलेट सायलेन्सरवर विजापूर नाका पोलिसांनी कारवाई केली आहे. बुलेटचे सायलेन्सर काढून घेऊन १२ बुलेट गाड्यांवर एकूण 42 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच बुलेट गाडीचे सायलेन्सर काढून पोलिसांनी जप्त केले आहे.
सोलापूर शहर पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी चार्ज घेतल्यानंतर सोलापूरकरांच्या वाहतुक समस्येच्या दृष्टीने वाहतुकची कोंडी होणार नाही, तसेच नागरिकांना त्रास होणार नाही याच्या उपाययोजना करण्याचे योजिले आहे.
बुलेटच्या सायलेन्सर मध्ये फेरफार करून कॉलेज परीसर आणि सामान्य नागरिाकांना त्रास होईल अशा पद्धतीने रोडरोमिओ हे त्या बुलेटच्या पुंगळ्या काढुन वेगवेगळे आवाज काढुन रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवित असतात. अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचे नियोजन सोलापूर शहर पोलिसांनी केले आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...