सोलापूर – पुन्हा एकदा राज्यात राजकिय भूकंप घडला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकार मध्ये 30 आमदार सह सामील झाले, आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतली, त्या नंतर सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केले आणि फटाके फोडले.
रविवारी दुपारी दोनच्या सुमारास राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याशिवाय राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या 30 आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जल्लोष केला.
यावेळी संतोष पवार, जुबेर भगवान, आनंद मुस्तारे, महेश निकंबे यांच्या सह राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...