सोलापूर – येथील रेल्वे मैदानावर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल) शनिवारपासून ‘सोलापूर मीडिया कप -2024’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. सोलापूर ॲडव्हर्टायझिंग एजन्सिज वेल्फेअर असोसिएशन (सावा) आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत आठ संघांचा सहभाग असल्याची माहिती ‘सावा’चे सचिव निशांत पोरे आणि श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी दिली.
येत्या शनिवार, 9 व रविवार, 10 मार्च असे दोन दिवस ही स्पर्धा होत आहे. पहिल्या दिवशीचे सामने लिग पद्धतीने आणि दुसऱ्या दिवशी टॉप सहा संघातील सामने नॉकआऊट पद्धतीने होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम. राज कुमार व पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. दैनिक लोकमत, दिव्य मराठी, संचार, सोलापूर तरुण भारत, तरुण भारत संवाद, सोलापूर डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशन, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि ‘सावा’ हे 8 संघ स्पर्धेत सहभागी आहेत. स्पर्धेसाठी जरिया फाऊंडेशन, हाजी फारूक शाब्दी फाऊंडशेन, आपटे डेअरी यांचे सहकार्य लाभले आहे. आफताब शेख, आप्पासाहेब पाटील, सागर सुरवसे, विक्रांत कालेकर, गिरीश मंगरूळे, नितीन ठाकरे, सुभाष कलशेट्टी, संदीप जव्हेरी, किरण बनसोडे व संयोजन समितीतील सर्व सदस्य स्पर्धेसाठी परिश्रम घेत आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने सोलापुरातील सर्व पत्रकार आणि मीडिया प्रतिनिधी आमनेसामने येणार असल्याने स्पर्धेची उत्सुकता वाढली आहे
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...