सोलापूर – करमाळा येथील तहसिल कार्यालयातील मंडल अधिकारी 20 हजार रुपयांची लाच रककम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे शाहिदा युनुस काझी, वय 42 वर्षे पद- मंडळ अधिकारी यांना सापळा लावून रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
यातील तक्रारदार यांनी वारस नोंदच्या अनुषंगाने मंडळ अधिकारी कार्यालय उमरड येथे हरकती अर्ज सादर केला असून सदर अर्जावर सुनावणी करुन तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्याकरता यातील मंडळ अधिकारी शाहिदा काझी यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अति 20 हजार रुपये लाचेची मागणी केली व सदर लाच रक्कम आज जेऊर शहरामध्ये असलेल्या मंडळ अधिकारी कार्यालय उमरड येथे स्वतः स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. करमाळा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचार संबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...