सोलापूर – सॅमसन रुबीन डॅनियल (वय २५. रा. बेतुरकरपाडा, क्वालिटी कंपनी, डॅनियल हाऊस, रूम नं ५, कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे) या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी तीन तासात अटक करून चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
वीस दिवसापूर्वी जेल मधून सुटलेला कल्याण आणि नवी मुंबईचा सराईत गुन्हेगार शनिवारी किंवा रविवारी सोलापुरात यायचा अन बंद घराची रेकी करून भरदिवसा घरफोडी करून तो पसार व्हायचा. एकाच दिवशी सुमारे चार ते पाच घरे फोडणाऱ्या या आरोपीला पोलिसांच्या तिसऱ्या नजरेने हेरलेच अन हा आरोपी विजापूर नाका डी बी पथकाच्या जाळ्यात अडकला.
विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीतील दाखल असलेल्या घरफोडीच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने आणि तांत्रिक माहितीच्या आधारे सोलापूर रेल्वे स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितल कुमार गायकवाड आणि त्यांच्या पथकाने सोलापूर रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून सराईत गुन्हेगार सॅमसंग डॅनियल याला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आणि त्याच्याकडून 27 हजार 680 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची विशेष कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलिस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शितल कुमार गायकवाड, समाधान मारकड, गणेश शिर्के, हुसेन शेख, सचिन हार, संतोष माने, श्रीनिवास बोल्ली, अमृत सुरवसे, सद्दाम आबादी राजे, राहुल सुरवसे, स्वप्निल जाधव, रमेश कोर्सेगाव, हरिकृष्ण चोरमुले यांनी पार पाडली.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...