सोलापूर – गुटखा आणि मावा आरोग्यास हानिकारक असल्यामुळे राज्यात गुटखाबंदी आहे, असे असताना सुद्धा सोलापूर शहारात सर्रासपणे अवैध गुटखा आणि मावा विक्री जोमात सुरू आहे, या खुलेआम विक्रीबावर अन्न औषध प्रशासनाची ‘नजर’ पडत नसल्याचा दिसून येत आहे.
तंबाखूजन्य पदार्थ गुटखा आरोग्यास हानिकारक असल्यामुळे त्यापासून कर्करोगासारखे गंभीर आजार होतात, या पदार्थांचे सेवन करणाऱ्याला सावधानतेचा इशाराही गुटखा तंबाखूच्या पुड्यांवर नमूद केले जाते, तरुण पिढी नागरिक यापासून होणाऱ्या जीवघेण्या आजारापासून वाचावे यासाठी शासनाने यावर बंदीही घातली आहे, तरीही सोलापूर शहरात सर्रास गुटखा आणि मावा विक्री सुरू आहे, परंतु सोलापूर शहरातच मुख्य कार्यालय असलेल्या अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना हे दिसत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.
गुटख्यामुळे देशाचे भावी आधारस्तंभ असलेल्या तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे, यामुळे व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढत असून, युवा पिढी यात वाया जाताना दिसत आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...