सोलापूर – वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला महाबळेश्वर येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच अत्याचारावेळीचे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरूणासह त्याच्या कुटुंबातील सहा जणांवर फौजदार चावडी पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने पीडितेला डिसेंबर २०२२ मध्ये महाबळेश्वरला नेले, तेथे आरोपी नितीन राजप्पा कटके (वय २४, बसवेश्वर गल्ली, लातूर) याने तिच्यावर अत्याचार केला, तेथून दुसऱ्या रिसॉटवर नेऊन अत्याचार करत त्यावेळी त्याने फोटो काढले, त्यानंतर काही दिवसांनी ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी पीडितेला जबरदस्तीने आळंदी येथे नेऊन तिला स्वतासोबत लग्न करण्यास भाग पाडले.
याबाबत पीडितेने कुटुंबियांना सांगितले, पीडितेच्या कुटुंबियांनी आरोपीच्या वडिलाला भेटून अत्याचाराचे फोटो डीलिट करण्यास सांगितले, त्यांनी यासाठी २० लाख रूपयांची मागणी केली, अशी फिर्याद पीडितेने दिली आहे. या फिर्यादीवरून नितीन कटके (वय २४, रा. लातूर), काशीनाथ कटके, निकेतन कटके, रेष्मा कटके (सर्व रा. पुणे), किसन, आणि ज्योती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास फौजदार चावडीचे पोलिस करत आहेत.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...