. सोलापूर – भारतीय समाज बहुसांस्कृतिक समाज आहे, यामध्ये विविध धर्म, आणि विचारांचे लोक, विविध जाती समूहाची संबंधित व्यक्ती, विविध संप्रदाय व जमाती, विविध भाषा बोलणारे आणि विविध संस्कृतींना मानणारे लोक अनेक शतकांपासून शांततापूर्वक एकत्र राहत आले आहेत. धर्म संस्कृती, भाषा व परंपरेमध्ये परस्पर भिन्नता असताना सुद्धा आपसात मिळून मिसळून राहतात. पण सध्या आपला देश अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहे. सांप्रदायिक संघर्ष, हिंसा, असहिष्णुता, भडकावृत्ती, अविश्वास, गैरसमज आणि आरोप प्रत्यारोपामुळे शतकानू शतकांचे नाते अपमानित तसेच सामाजिक बंद प्रभावित होण्याची संशय निर्माण होत आहे देश वासियांदरम्यान सध्या असलेले आपसातील प्रेम, बंधुभाव, शांती आणि मानवता यासारख्या मूल्यांचा न्हास होण्याची भीतीही निर्माण झाली आहे. असं वाटतं की नियोजनबद्द रीतीने लोकांचे बुद्धी भ्रष्ट केली जात आहे आणि पूर्ण समाजाला एका विशिष्ट दिशेला वळविण्याचा प्रयत्न होत आहे. ज्या रेशीम बंधानी शतकांपासून परस्परांना जोडून ठेवले होते, त्या सामाजिक ऐक्याला उखडून फेकणे हाच सांप्रदायिक शक्तीचा मूळ उद्देश आहे. या परिस्थितीत आनंदाची बाजू ही आहे की, देशात आज सुद्धा शांतताप्रिय व न्यायप्रिय व्यक्ती मोठ्या संख्येत आहेत. ते या परिस्थितीमुळे चिंतित झाले आहेत. या परिस्थित सुधार करण्याच्या उद्देशाने 1 ऑक्टोंबर ते 10 ऑक्टोंबर 2023 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र (दक्षिण ) मध्ये “आपण कुठे जात आहोत “? या शीर्षकाखाली अभियान राबविणार आहे. एस. आय. वो कडून सोलापूर मराठी पत्रकार भवन याठिकाणी आज या अभियाना अंतर्गत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत एस. आय. वो. चे सुफियान मन्सुरी, उजेर रंगरेज, शफीक काझी आणि यावेळी एस. आय. वो. चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...