सोलापूर – सावित्रीमाई शिक्षण आणि बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या यंदाच्या सावित्रीरत्न पुरस्कारासाठी दैनिक ‘संचार’चे उपसंपादक नंदकुमार येच्चे यांच्यासह विविध क्षेत्रातील आठजणांची निवड करण्यात आल्याची घोषणा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव जंबगी यांनी केली.
या पुरस्कारासाठी निवड झालेल्यांमध्ये येच्चे यांच्यासह अक्षरा आणि आरोग्या हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालिका सारिका सचिन नरोटे, हत्तूर- चंद्रहाळच्या सरपंच ज्योती राजेंद्र कुलकर्णी, सोलापुरातील मातोश्री नर्सिंग होमच्या डॉ. योगिनी सचिन जाधव, शंकरलिंग महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्री मल्लिनाथ थळंगे, अभियंता महादेव ईरण्णा आकळवाडी, साप्ताहिक शौर्यचे संपादक योगेश्वर विठ्ठलसा तुरेराव, पानमंगरुळचे ग्रामविकास अधिकारी शिवानंद भीमराया सोलापूरे या आठजणांचा समावेश असून मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
येत्या बुधवारी, 14 जून रोजी सकाळी 11 वाजता रंगभवन येथील समाज कल्याण केंद्रात या पुरस्काराचे वितरण निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार आणि जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी डॉ.अशोक हिप्परगी, एम.के. फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे, पानमंगरूळचे उपसरपंच मलिक मुजावर, नाना रणदिल, सुधीर जोशी आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास जास्तीतजास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष जंबगी, उपाध्यक्षा राजश्री तीर्थ आणि सचिवा सारिका पवार यांनी केले आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...