सोलापूर – सोलापूरहून पुण्याकडे निघालेल्या घोंगडे वस्ती येथिल ३ मुलांचा टेंभुर्णीजवळ मध्यरात्री अपघातात मृत्यू झाला असून दोघांना रात्री टेंभुर्णी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १ मुलाचा सोलापुरातील सिव्हिल रुग्णालय येथे उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भवानी पेठेतील शिवप्रेमी मित्र मंडळाचे सदस्य कै. राज हळके, कै. तेजस इंडी, कै. गणेश शेरीकर असे या अपघात झालेल्यांची नावे आहेत. शिक्षणासाठी पुण्याकडे जाणाऱ्या तिघा मित्रावर झालेल्या अपघाताने घोंगडेवस्तीत शोककळा पसरली आहे. तिघेही बसव प्रतिष्ठानचे सदस्य आणि शिवप्रेमी मित्र मंडळाचे कार्यकर्ते असल्याची माहिती मिळाली आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...