सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि अक्षर मानव यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षर मानव चित्रपट वितरण आणि प्रदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी साधारण १२० मराठी चित्रपटांची निर्मिती होत आहे, परंतु त्यातील १० ते १५ चित्रपट प्रदर्शित होतात तर उर्वरित चित्रपटांना काहीच भवितव्य नसते, चित्रपट निर्मितीमध्ये घातलेला पैसा परत न मिळाल्यामुळे निर्माता निराश होतो, चंदेरी दुनियेने असल्यामुळे बरेचजण चित्रपट निर्मितीकडे वळतात पण चित्रपट कसा विकावा, वितरित करावा, प्रदर्शित करावा, याचे ज्ञान नसल्यामुळे पदरी निराशा येते, हे जर आधीच माहित असेल तर त्याप्रमाणे नियोजन करता येते आणि यशस्वीरित्या चित्रपट प्रदर्शित करता येतो, म्हणूनच छोटे-मोठे चित्रपट निर्माता ज्यांनी चित्रपट तयार केला आहे, किंवा करू इच्छितात किंवा चित्रपट वितरण हा व्यवसाय म्हणून करू इच्छितात त्यांच्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत महत्वाची आहे.
अक्षर मानव चित्रपट वितरण व प्रदर्शन कार्यशाळा, शनिवार आणि रविवार दिनांक २७ व २८ मे २०२३ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येत आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन मा. मेघराज राजे भोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थान राजन खान, ज्येष्ठ साहित्यिक हे भूषविणार आहेत. या कार्यशाळेमध्ये चित्रपट वितरण, चित्रपट निर्मिती आणि विक्री, प्रदर्शन आणि कायदेशीर प्रक्रिया, तुमच्या गावात तुम्हीच व्हा चित्रपट वितरक, चित्रपट वितरण आणि निर्माता, ओटीटी माध्यम व चित्रपट वितरण आणि थिएटर मालक व वितरण या अतिशय महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन दिले जाणार आहेत.
सदर कार्यशाळेसाठी जास्तीत जास्त इच्छुकांनी दिनांक २५ मे २०२३ पर्यंत अॅड. रवि गजधाने यांच्या ७०२०००२६०८ मोबाईल क्रमांकावर पुर्व नोंदणी करावी असे आवाहन अक्षर मानव चित्रपट विभाग सोलापूर याचे अध्यक्ष डॉ. औदुंबर मस्के यांनी केले आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...