सोलापूर – सोलापूर बार्शी रस्त्यावर उड्डाणपूलजवळ दुचाकी गाडी आणि माल ट्रक यांच्यात अपघाता झाला, या झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
नारायण घोलप आणि काशिनाथ नरोटे (रा दडशिंगे) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. हे दोघे एमएच 13 AP-2662 या दुचाकी गाडीवरून गावाकडे निघाले होते, दरम्यान सोलापूर वरून येत असलेल्या मालट्रक (MH 45 -AS 2025) ने या दुचाकिला धडक दिल्याने दुचाकी वरील दोघेजण जागी ठार झाले. रस्त्यावर मृतदेह पडलेले होते. घटनेची माहिती मिळताच तात्काळ बार्शी शहर पोलीस स्टेशनचे स.पो.नी ज्ञानेश्वर उदार, पी.एस.आय गजानन कर्णेवाड आणि पथक घटनास्थळी दाखल झाले, बार्शीपासून अपघात स्थानजवळच असल्याने रस्त्यावर बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...