सोलापूर शहरात पाणी टंचाईचा खूपच त्रास असून या मुळे नागरिक खूप त्रस्त आहे, शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून अनेकांनी आंदोलने केली, मात्र प्रशासनाला याचा काहीच प्रणाम झालेला दिसत नाही, या मुळे नुकताच दोन जणांना आपला जीए सुध्दा गमवावा लागला, म्हणून या विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी महापालिकेसमोर पाण्याचे रिकामे माठ फोडून बोंबाबोंब आंदोलन केले, शहरातील पाणी टंचाई दूर करण्याऐवजी भाजप नेते उद्घाटन कार्यक्रमात व्यस्त असल्याची टीका या वेळी कार्यकर्त्यांनी केली.
भाजप नेते, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी विविध विकास कामांचे उद्घाटन झाले होते. या कार्यक्रमाचा निषेध म्हणून शुक्रवारी आंदोलन केल्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी सांगितले. कार्यकर्त्यां कडून महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर, प्रवीण जाधव, विश्वराज चाकोते, तिरुपती परकीपंडला, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, शरद गुमटे, महेंद्र शिंदे, संजय गायकवाड, दाऊद नदाफ, युवराज जाधव, समीर काझी, अशुतोष वाले, धीरज खंदारे, मनोहर चकोलेकर, अजिंक्य पाटील, चंद्रकांत नाईक, बबलू जाधव, यासीन शेख, शिवराज कोरे, किरण राठोड, ओंकार पवार, निखिल पवार, गणेश देवसानी,आकाश भोसले आदी उपस्थित होते.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...