सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे कडेस मिळालेल्या माहीती प्रमाणे गाडी क्रमांक ११०१९ कोणार्क एक्सप्रेस गाडीचे बोगी न बी/४ बर्थ नं ५० वरून महिला नामे सुभद्रा कामेश्वर साहु वय २७ वर्षे राहणार भुवनेश्वर, ही तिच्या पतीसह प्रवास करीत असताना सदर महिलेस कुडुवाडी रेल्वे स्टेशनपासूनच प्रसव वेदना तीव्र झाल्याने, गाडीतील ऑन ड्युटी टि. सी. यांनी रेल्वे पोलीसानां संपर्क केले, तेव्हा तात्काळ स्टेशनवर हजर असेलेले रेल्वे पोलीस आणी आर.पी.एफचे कर्मचारी आणि स्टेशनवरील अश्विनी हॉस्पीटलचे ओपीडीतील वैदयकिय अधिकारी, यांना सोबत घेवून सदर रेल्वे गाडी ही सोलापूर रेल्वे स्टेशनवर येताच नमुद तात्काळ महिलेची तपासणी करून तिला जास्त त्रास होत असल्याने पुढील उपचारकामी अश्विनी हॉस्पीटल सोलापूर येथे पाठविण्यात आले, त्यावेळी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणेकडील महिला पोलीस अंमलदार पल्लवी रहागंडाले आणी वैष्णवी दबडे यांनी मोलाची साथ देवून सदर महिलेस मायेचा ऊब दिला.
सदरच्या मदतीमध्ये सोलापूर रेल्वे स्टेशनवर रात्रपाळीला डयुटीस असणारे पोलीस उप निरीक्षक एस एन जाधव, पोलीस उप निरीक्षक एस एल भाजीभाकरे, पो. हवा. आर डी पवार, ओ व्ही पाटील, पो. कॉ. बनसोडे, एच एम जाधव, इंगीले यांनी मोलाची साथ दिली आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...