सोलापूर – शहर हद्दीतील पोलीस ठाण्यात विविध प्रकारच्या गुन्ह्यांमधील पाहिजे असलेल्या ५७ फरार आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे, सोलापूर शहरातील ५७ आरोपी फरार होते.
आरोपी हे अटक कारवाई पासून स्वतःचा बचाव होण्यासाठी स्वतःची ओळख लपवून राहत होते, अशा आरोपींना न्यायालयाकडून फरार घोषित करण्यात आला होता, तसेच सुनावणी चालू असलेल्या फौजदारी खटल्यातील आरोपी न्यायालयाने दिलेल्या तारखेस सुनावणीसाठी उपस्थित राहिले नाहीत तर, न्यायालय अशा आरोपींना पकडून आणण्यासाठी अटक वॉरंट जारी करतात.
अशा अटक वॉरंटमधील आरोपींचा शोध घेवून, त्यांना अटक करण्याची मोहीम राबवण्यात आली होती. यानुसार जून २०२२ ते मे २०२३ या कालावधीमध्ये सोलापूर शहर, जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यांमधील, त्याचप्रमाणे परराज्यातील आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उप- आयुक्त डॉ. दीपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे, प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वपोनि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ दिलीप किर्दक, पोह नवनीत नडगेरी, पोना तात्यासाहेब पाटील, पोशि भारत पाटील, सपोनि संदिप पाटील, सपोनि जीवन निरगुडे व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...