भारत देश हा एकातमतेचा प्रतीक आहे, यात सर्व धर्मीय बांधव मिळून राहतात आणि एक मेकांच्या सणासुदीला उपस्थित राहतात, पण सध्याच्या काळात, राजकारणा मूळे देशाच्या वातावरण बिघडवण्या प्रयत्न चालू आहे, अश्या वातावरण मध्ये सर्व देशवासियांना एकात्मता दाखवण्याची गरज आहे, याच अनुषंगाने जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी, आझाद सोशल फाउंडेशनच्या वतीने ईद मिलनचा कार्यक्रम दिनांक ०६ मे रोजी सोशल उर्दू हायस्कूल, मुस्लिम पाछचा पेठ सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी अनेक मान्यवरांनी इस्लाम बद्दल गैरसमज दूर करण्यासाठी आणि देशाच्या हितासाठी हिंदू मुस्लिम बांधवांनी कसे मिळून काम करावे यासाठी आप आपले मनोगत व्यक्त केले.
हा कार्यक्रम मुफ्ती सय्यद अमजद अली काझी यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्यासह जावेद खैरदी, रियाज सय्यद, महेश गाडेकर, भारत जाधव, प्रकाश वाले, चेतन नरोटे, सबिना इंगळगी, रियाज हुंडेकरी, राफे काझी, विष्णू कारामपुरी, शमशाद काझी, रियाज बागबान, आसिफ इक्बाल आणि अनेक हिंदू मुस्लिम बांधवाचा उपस्थित मोठ्या उत्साहाने पार पडला.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...