सोलापुरातील जोड बसवना चौक येथे एका मोटर सायकलवरुन ट्रीपलसीट प्रवास करीत असताना, तेथिल लोकसेवक श्रीकांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक, यांनी तक्रारदार यांचे भाऊ यांना अडवून त्यांचेकडील मोटर सायकल सोलापूर शहर वाहतुक शाखा उत्तर, येथे आणून जमा केली. त्यानंतर यातील तक्रारदार हे सदरची मोटार सायकल सोडण्याकरीता लोकसेवक जाधव, यांना भेटले असता, जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे २,७००/- रुपये रक्कमेची मागणी करुन त्यापैकी ७००/- रुपये दंडाची ऑनलाईन पावती तक्रारदार यांना देऊन उर्वरीत २,०००/- रुपये लाच रक्कम स्वरुपात स्वतः करीता स्वीकारले. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनीयम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे. श्रीकांत बलमीम जाधव, पद- पोलीस उप-निरीक्षक, (वर्ग-२) नेमणूक सोलापूर शहर वाहतुक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेऊन, जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कारवाई गणेश कुंभार, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि, सोलापूर, यांच्या मार्गदर्शनाखाली उमाकांत महाडिक, लाप्रवि, सोलापूर, पोना स्वामीराव जाधव, अतुल घाडगे, पोकॉ सलिम मुल्ला व चालक शाम सुरवसे, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारा संबंधीत गर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...