. सोलापूर – जागेच्या अनुषंगाने समोरील व्यक्तीने दिलेली तक्रार दाखल करून न घेण्यासाठी तक्रारदाराकडे तब्बल पाच लाखांच्या लाचेची मागणी केली. त्यातील पहिला हप्ता घेण्यास संमती दर्शविल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक पोलिस निरीक्षक संजय मनोहर मोरे वय ५७ याला आज जेरबंद केले. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
विजापूर नाका पोलिस ठाण्यात कार्यरत संजय मोरे याच्याविरूद्ध तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली होती. त्याअनुषंगाने बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, चंद्रकांत कोळी, पोलिस हवालदार शिरीषकुमार सोनवणे, पोलिस नाईक अतुल घाडगे, स्वामीराव जाधव, सलिम मुल्ला, वाहन चालक पोलिस शिपाई राहुल गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही मोरे याला लाचेचा मोह आवरला नाही, हे विशेष. तो सध्या विजापूर नाका पोलिस ठाण्यात कार्यरत होता. त्याला त्याच्या घरातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई उमाकांत महाडिक, चंद्रकांत कोळी पोलीस निरीक्षक, प्रवि सोलापूर पोलीस अंमलदार पोहा शिरीषकुमार सोनवणे, पांना अतुल पाउने पीना स्वामीराव जाधव पोकों सलिम मुल्ला व चालक राहुल गायकवाड सर्व नेम लाप्रति सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...